नाशकात थरार! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं.

नाशकात अजित पवारांच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार सश्त्राने वार करत दोन सख्ख्या भावांना संपवलं आहे. या घटनेने नाशकात एकच खळबळ माजली आहे.नाशिक शहरामध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. शहरात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव अशी हत्या झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावं आहेत.

यातील उमेश उर्फ मुन्ना जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या दोघांची हत्या करून अज्ञात हल्लेखोर फरार झाले आहेत. या दोन भावांची हत्या का करण्यात आली याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही. मात्र, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासाठी नाशिक क्राईम ब्रँच सह विविध विभागातील पोलिसांची चार पथकं हल्लेखोरांच्या शोधासाठी नेमण्यात आली आहेत.

सुरुवातीला हल्लेखोरांनी गोळीबार करत हत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार झाला नसल्याची माहिती दिली आहे. धारदार शस्त्राने वार करून या दोघा भावांची हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील दोघांची एकाच वेळी हत्या करण्यात आल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांनी दोघांचा खून का केला? नेमकी कारण काय? हल्लेखोर कोण होते? कुठून आले होते? किती जण होते? हे सर्व माहिती पोलीस तपासात समोर येणार असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.