नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासात हादरवणारी माहिती समोर.

नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.नागपूर दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी याप्रकरणी ५० हून अधिक आरोपींवर कठोर कारवाई करत गंभीर कलमं लावली आहेत. गेल्या काही दिवसांपासून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही व्हिडिओ आणि मेसेज परदेशी आयपी अ‍ॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत अनेक संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि यामागे मास्टरमाइंड म्हणून फहीम खानचे नाव समोर आले.विश्व हिंदू परिषद  आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाच्या कबरीचे दहन केले होते. या घटनेनंतर, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी  चे शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांनी काही युवकांनी ‘आयत’ असलेली चादर जाळल्याचे सांगून हे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले. यानंतर, फहीम खान यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चादर जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी त्यांना आश्वासन देऊन परत पाठवले. मात्र, त्यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली काही युवक जात असताना त्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि दंगल उसळली.नागपूर सायबर पोलिसांनी या संपूर्ण कटाचा तपास सुरू केला असून, आरोपींनी वापरलेले मोबाईल आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्हिडिओ आणि मेसेज बांगलादेशमधून व्हायरल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचा तपास सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आरोपींवरील देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्यांच्यावर मोठ्या शिक्षेची टांगती तलवार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या आणि देशविघातक कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही आरोपींची नावं लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांकडून सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.