खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय.

सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले अटकेत आहे. सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यादरम्यान आता सतीश भोसलेचा मुक्काम पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच वनविभागाने खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता. वनविभागाच्या ज्या जागेवर खोक्याने आपले बस्तान बसवले होते ती आलिशान इमारत त्याशेजारी असणारे खोक्याचे ऑफिस दोन्ही पाडण्यात आले आहेत.

दरम्यान गुन्हेगारीचा इतहास असणारा खोक्या भाई गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. भाजपचा पदाधिकारी आणि भाजप आमदार सुरेश धसांचा कट्टर कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे. भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती .

यानंतर सतीश भोसले ची दहशत मोठ्या चर्चेचा विषय बनली .जिल्ह्यातील एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याची दहशत समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा नोंदविला आहे. तर शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी देखील सतीश भोसले वर दुसरा गुन्हा नोंदविला गेला. या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.