थेंबभर पाण्यासाठी महिला ‘दीन’! आदिवासी महिलांचा एल्गार, नाशिक जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढत आंदोलन.

नाशिकसह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तत्पूर्वी डोक्यावर रिकामे हंडे घेत त्यांनी भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी अनवाणी आदिवासी नृत्य करीत प्रशासनाचा निषेध केला.शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळात जागतिक महिला दिनाचे कौतुक सोहळे साजरे होत असताना नाशिकसह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तत्पूर्वी डोक्यावर रिकामे हंडे घेत त्यांनी भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी अनवाणी आदिवासी नृत्य करीत प्रशासनाचा निषेध केला.जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी सांस्कृतिक अन् क्रीडा महोत्सवात रममाण असताना मैलोन्‌मैल पायपीट करीत आदिवासी वाड्या-पाड्यांमधून या महिला नाशिकमध्ये दाखल झाल्या त्यावेळी आज (शनिवारी) महिला दिन असल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. ‘आम्ही भीक मागत नाही, हक्काचं थेंबभर पाणी मागतोय’, अशी आर्त हाळी देत तहानलेल्या लेकरांच्या डोक्यावर पदर झाकत या महिलांनी रणरणत्या उन्हातच बसकण मारली.एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली या आदिवासी महिलांच्या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करण्यात यावी, वगळण्यात आलेले आदिवासी पाडे या योजनेत समाविष्ट करावेत, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यांमध्ये जलजीवनची कामे मंद गतीने सुरू आहेत. यातील अपूर्ण योजनांच्या दोषींवर कारवाई करण्यात यावी, पाणीटंचाई असणाऱ्या आदिवासी पाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्या महिलांनी केल्या. जि. प. च्या माध्यमातून सुरू असणाऱ्या जलजीवन मिशनची पहिल्या तिनही टप्प्यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण योजनांच्या कामांची देयके ठेकेदारांना देण्यात येऊ नयेत, या योजनेच्या मुदतीत अंमलबजावणीसाठी कारण ठरलेल्या ग्रामसेवक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.मोर्चामध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, जिल्हाध्यक्ष भीमा गुंबाडे, सरचिटणीस वसंत इरते, भीमाबाई मागटे, सरूबाई पाडेकर, कमायबाई येरंदे, इंद्राबाई धांडे आदींसह महिलांनी सहभाग घेतला.

आदिवासी तालुक्यांमध्ये सुरू असणाऱ्या जलजीवन मिशन योजनेची कामे ही धीम्या गतीने सुरू असल्याची या आंदोलकांची नाराजी आहे. या योजनेच्या कामांची मुदत उलटून जाऊन तिला मुदतवाढदेखील मिळते मात्र आदिवासी गावे, वाडे-पाडे, आश्रमशाळा अन् अंगणवाड्यांसारखी ठिकाणे थेंबभर पाण्यासाठी दिवस अन् दिवस प्रतीक्षा करतात, हे चित्र सुखवाह नसल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.नाशिकसह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली. महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ऊन वाढत जाईल तशी स्थिती आणखी बिकट होत जाईल. प्रशासनाने आदिवासी पाड्यांना पाण्यासाठी आश्वस्त करावे.

  • Related Posts

    जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्षात अचानक शॉर्ट सर्किट, नाशिकमध्ये अनुचित प्रकार टळला.

    नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी…

    नाशकात थरार! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं.

    नाशकात अजित पवारांच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार सश्त्राने वार करत दोन सख्ख्या भावांना संपवलं आहे. या घटनेने नाशकात एकच खळबळ माजली आहे.नाशिक शहरामध्ये खुनाचे सत्र सुरूच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !