बाभुळगाव येथे आज पासुन 3 दिवसीय संत श्री गजानन महाराज प्रकट दिवस सोहळ्याची सुरुवात.

बाभुळगाव येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार जपत आहे अध्यात्मिक व धार्मिक वारसा उद्या शिवजयंती निमित्ताने कीर्तनाचे आयोजन.तालुक्यातील बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे एक भव्य व दिव्य असे मंदिर असून या ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे होत असते. सालाबादाप्रमाणेच याही वर्षी संत श्री गजानन महाराज्यांचा १४७ प्रकट दिवस सोहळ्याचे आयोजन हे केलेले आहे. संत श्री गजानन महाराज भक्त परिवार सर्व कार्यक्रम उत्सहात साजरे करत असतात. आज पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील प्रमाणे. आज सकाळी पहाटे 5 वाजता श्रींच्या अभिषेक व पारायण ( पुरुष), सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आरती, ८ :२५ मिनिटांनी पारायण (महिला), दुपारी तीन वाजता पालखी सोहळा व संध्याकाळी 7 वाजता श्रींची आरती.
उद्या दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे ५ वाजता श्रींचे अभिषेक व पारायण नंतर सकाळी ८:३० वाजता श्रींची आरती नंतर सकाळी ९ वाजता (महिला) पारायण, संध्याकाळी ६ वाजता श्रींची आरती संध्याकाळी ७ वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व पूजा, संध्याकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी कीर्तन सोहळा चे आयोजन केलेले आहे.

ह.भ.प. सुजित महाराज जळगावकर यांचे जाहीर व दणदणीत असे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.दिनांक 20/ 2/ 2025 गुरुवार रोजी पहाटे ५ वाजता श्री च्या अभिषेक व पारायण (पुरुष) नंतर सकाळी ८ वाजून 30 मिनिटांनी श्रींची आरती व सकाळी ९ वाजता पारायण (महिला) तदनंतर संध्याकाळी ५ वाजता श्रींची महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न होऊन संध्याकाळी 6 वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल सर्व भक्तांनी महाप्रसादाच्या लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गजानन महाराज मंदिर बाभूळगाव यांनी केलेली आहे.संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ वा प्रकाश दिवस सोहळा हा उत्साहात संपन्न होत आहे महाराजांच्या प्रकट दिवसाच्या या आरतीच्या लाभाने भक्तांनी मनात ठेवलेली मनोकामना श्रींच्या चरणी अर्पण केल्यास भक्तांची मनोकामना 100% पूर्ण होते असे संत श्री गजानन महाराजांचे भक्तांनी अनुभव व्यक्त केले आहेत. संपूर्ण गावाने व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आरतीच्या भंडाराच्या लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गजानन महाराज भक्त परिवार बाभुळगाव यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.