महिलानो सावधान : वृद्धेच्या गळ्यातून चोरट्यांनी लांबविली सोनपोत !

मंदिरातून घरी येत असलेल्या शेवंताबाई काशीनाथ पाटील (वय ८५) या वृद्धेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सोनपोत लांबवली. ही घटना मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपामागील हायवेदर्शन कॉलनीत घडली. पोत ओढतांना वृद्ध महिला रस्त्यावर कोसळून जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा पोलीस दलातील दहशतवाद विरोधी शाखेमध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक भाऊसाहेब काशीनाथ पाटील हे हायवेदर्शन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची आई नेहमीप्रमाणे त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या टीळक नगरातील विठ्ठल मंदिरात गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या रस्त्याने घराकडे येण्यासाठी निघाल्या. घरी जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असतांना मागून भरधाव वेगाने दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांनी पुढे जावून काही अंतरावर दुचाकी थांबवली. पुन्हा ते वृद्ध महिलेच्या दिशेने गेले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून नेली. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी वृद्ध महीलेच्या गळ्यातील सोनपोत ओढल्यामुळे वृद्ध शेवंताबाई पाटील या रस्त्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी येत असल्याचे दिसताच चोरटे तेथून पसार झाले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दुचाकीवरुन दोन चोरटे सोनसाखळी चोरतांना कैद झाले आहे. पोलिसांनी ते फुटेज हस्तगत केले असून त्यानुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.