थोर सन्मित्र फाउंडेशनच्या नियोजित यात्री निवासाचे भूमिपूजन संपन्न.

थोरगव्हाण येथे थोर सन्मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री . उमाकांत वसंत बाऊस्कर यांच्या सौजन्याने फाउंडेशनला 2300 चौ.फुट जागा (R. P. चौधरी सर यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जिनिंगमध्ये असलेली) गिफ्ट निस्वार्थ दान करण्यात आली. या जागेवर नियोजित यात्री निवासाच्या इमारतीचे भूमिपूजन सचिव योगेश झोपे सह खजिनदार विलास चौधरी , अध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर सर्वमान्यवर यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.यात्री निवासाचे उद्दीष्ट: गावाला येणाऱ्या प्रवाशांना, यात्रेकरूंना, लग्नसमारंभ किंवा अन्य धार्मिक सामाजिक , खासगी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना तसेच काही दिवस गावी शांत वेळ घालवण्यासाठी या निवासाचा उपयोग होणार आहे. अशी माहिती खजिनदार विलास चौधरी यांनी दिली .

या उपक्रमासाठी अनेक समाजबांधव व भगिनींनी आर्थिक व इतर स्वरूपाची मदत केली आहे.सढळहस्ते मदत करणारे दातागण:1. श्रीमती शोभा रवींद्र चौधरी (डोंबिवली) – ₹1,00,000 ,2. श्री विजय बाऊस्कर (इंदूर) – ₹ 50,000 , 3. श्री सुरेश बाळकृष्ण महाजन (खरगोन) – ₹1, 50,000 , 4. श्री. एस एस वैष्णव (शाळेचे मुख्याध्यापक) – ₹ 21,000 तसेच अभियांत्रिकी व इतर कामांसाठी पुढील दानशूर दाते योगदान देणार आहेत जगदीश वसंत महाजन (नाशिक) आण प्रसाद विश्वनाथ चौधरी (इंदूर) या दोघांनी प्लॅन, अंदाजपत्रक व अन्य तांत्रिक बाबींमध्ये मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन श्री. चंद्रकांत चौधरी, सचिव पवन चौधरी, फाउंडेशनचे सचिव योगेश झोपे, विलास चौधरी आणि श्री. नितीन रमेश चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.थोर सन्मित्र फाउंडेशनची विनंती केली आहे की सर्व समाजबांधव व भगिनींना आवाहन करण्यात येते की, या मोलाच्या व नविन्यपूर्ण कार्यासाठी आपणही सढळहस्ते मदत करून ही भव्य, सुसज्ज व उपयुक्त वास्तू उभारण्यासाठी हातभार लावावा.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.