ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.

ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.

उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे गटविकास अधिकारी अचलपूर यांना पत्र. अचलपूर : टवलार ग्रामपंचायत हद्दीतील किरण पाटील चित्रकार यांनी मालमत्ता क्र. 420 व 421 या जागेत तार कंपाउंड करून 1222.17 चौ. फुटाचे शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे, हे चौकशीत व अहवालात निष्पन्न झाल्यानंतर हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी ग्रामपंचायत टवलारच्या नावे लेखी आदेश काढलेला होता. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आदेशाला 4 महिन्यापासून केराची टोपली दाखवत ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी श्री अजय अंबादास देशमुख यांनी सदर अतिक्रमणवर निष्कासित करण्याची कारवाई केली नाही.

म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडतांना केलेल्या कसुरीबाबत ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लेखी आदेश दिलेला आहे. आपल्या कर्तव्याचे पालन न करता, गावातील अतिक्रमणास प्रोत्साहन देऊन शासकीय मालमत्तेचे रक्षण न करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांविरुद्ध टोकाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत तक्रारकर्ते  इमरान पठाण (संस्थापक/अध्यक्ष युवाशक्ती ग्रामविकास संगठन) यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.