गुरुवारी तो रोहिणीला भेटायला तिच्या घरी गेला. यावेळी रोहिणी घरी एकटीच होती. तिचा पती ढाब्यावर तर मुलगी शाळेत गेली होती. त्याने तिला दारू पाजली अन्…हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली. हुडकेश्वर पोलिसांनी खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची मंगळवार, ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.











