प्रशासन मस्त , ठेकेदार चुस्त मात्र नागरिक त्रस्त अशा अनुभव नागरिकांना येत आहे.पिंप्राळा परिसरातील साव रोड जवळील सोनीनगरजवळ पुल उभारण्यात आला असून तो कधी सुरू होणार असल्याची प्रतीक्षा नागरिक करीत असून बाजूला पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला पण ते देखील व्यवस्थित करण्यात आला नसल्याने परिसरातील महिला दुचाकीसह बांधकाम केलेल्या खड्ड्यात पडल्याने हाथ फेकचर होऊन जखमी झाल्याची घटना घडली.प्रशासन मस्त , ठेकेदार चुस्त मात्र नागरिक त्रस्त अशी ओरड सोनी नगरातील नागरिक करीत आहे.

पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्तावरचे पुलाचे बांधकाम दोन महिन्याभरापासून होत असून, नागरिकांना ये – जासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे ,पण तो ही व्यवस्थित नसल्याने नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कधी रिक्षा तर कधी चार चाकी अडकत आहे.दोन दिवसापासून समोरचा नाल्याचा सांडपाणी रस्तावर आल्याने तलाव साचल्याने नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली.सोनीनगरकडे जाणारा पुल कधी सुरू होणार
नाल्याचा सांडपाणी रस्तावर याबत कोणीही दखल घेण्यास तयार नसल्याने परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.










