थोरगव्हाण (ता. रावेर) येथे थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजातील गुणवंत व अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार) रोजी सकाळी ९:३० वाजता डी. एस. देशमुख हायस्कूल, क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर:कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिल देविदास चौधरी (नाशिक) असतील, तर कार्यक्रमाचे अन्नदाते सुरेश पंढरीनाथ झोपे (पुणे) आहेत.सत्कारमूर्ती म्हणून डॉ. दिपक अनंत बाऊस्कर (ठाणे), अनिल वामनराव पाटील (छत्रपती संभाजीनगर), प्रा. डॉ. शरतन अनिल चौधरी (धुळे), शरद वासुदेव पाटील (माजी सैनिक, भुसावळ) यांचा सन्मान केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुढीलप्रमाणे आहेत: दिपक तुकाराम चौधरी (पुणे),डॉ. गणेश पंडित पाटील (उल्हासनगर) ,डॉ. पंकज सुरेश महाजन (खरगोन) ,अभय मुरलीधर पाटील (इंदौर) ,ॲडव्होकेट भगवती नूरमल चौधरी (सुरत) ,पुष्कर जनार्दन पाटील (पुणे) ,विलास रामचंद्र महाजन (शेतकरी, फुलगाव) ,संध्या सुधिर पाटील (डोंबिवली) कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:वधू-वर परिचय मेळावा: समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी हा एक महत्त्वाचा सोहळा असेल.सत्कार समारंभ: समाजातील विविध क्षेत्रांतील यशस्वी व प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव.सामाजिक संवाद व एकत्रीकरण: विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या समाज बांधवांसाठी एकत्र येण्याची सुवर्णसंधी.११ वा वधू-वर मेळावा सूची प्रकाशन: विवाह इच्छुकांच्या संख्येचा आढावा घेत त्यांची अधिकृत नोंद करण्यात येईल.व्यापक आयोजन आणि मंडप व्यवस्था:या भव्य कार्यक्रमासाठी विशेष मंडप उभारणी, स्वागत समारंभ, तसेच सर्वांना अनुकूल व्यवस्था आयोजक मंडळाकडून करण्यात आली आहेसमाजबांधवांना आवाहन:थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ऊमाकांत वसंत बाऊस्कर, खजिनदार विलास माधव चौधरी आणि सचिव योगेश भागवत झोपे यांनी समाजातील बंधू-भगिनी, उपवर युवक-युवती, तसेच विविध ठिकाणी नोकरी-व्यवसाय व शिक्षणानिमित्त स्थायिक झालेल्या समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.तसेच, सामाजिक कार्यक्रम व यात्रोत्सवांच्या निमित्ताने मूळ गावी परतण्याचे नियोजन करावे, जेणेकरून या विशेष सोहळ्याचा लाभ सर्वांना घेता येईल.










