चंद्रपुरात लाखो रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांनी सापळा रचत केली विक्रेत्याला अटक.

चंद्रपूरात मोठ्या प्रणात अमंली पदार्थाची अवैध विक्री केली जात आहे. तरुण,अल्पवयीन मुले व्यसनाचा आहारी गेल्याचे भीतीदायक चित्र जिल्हात निर्माण झाले आहे.अश्यात गांजा विक्री करणाऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.  काळ्या सोन्याची खाण असलेल्या चंद्रपूर शहराला ब्लॅकसीटी म्हटलं जातं. कोळश्यासाठी जगभरात हे शहर प्रसिध्द आहे.या शहराची आणि जिल्हाची नवी ओळख आता पुढे येत आहे. जिल्हात रोज घडणारे क्राईम बघता जिल्हा हळूहळू गुन्हेगारांचे माहेर घर होत होत चालले आहे. भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटले नसताना गांजा विक्री करणा-या अट्टल गुन्हेगाराकडून लाखोचा गांजा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

जिल्हात एकीकडे हत्या, दरोडे,जुगार, चोरीचा घटनेत वाढ झालेली असताना अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात येथे विक्री सुरु आहे. तरुण,अल्पवयीन मुले व्यसनाचा आहारी गेल्याचे भीतीदायक चित्र जिल्हात निर्माण झाले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यावर अटक केली आहे.माहितीनुसार,बल्लारशाह शहरातील सरदार पटेल वार्ड येथील लालचंद केसकर हा गांजा आणि अंमली पदार्थाचा व्यवसायीक आहे.तो बल्लारपुर येथुन चंद्रपुर येथे गांजा विक्री करीत असतो.आज ( शुक्रवार )आपल्या दुचाकीच्या डीक्कीत गांजा घेऊन तो चंद्रपूरकडे निघाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी बल्लारशा- चंद्रपूर मार्गांवरील चुनाभट्टी बसस्टॉप येथे सापळा रचला.लालचंद केसकर दुचाकीने आला असता पोलिसांनी त्याची दुचाकी अडविली.दुचाकीची तपासणी केली असता दुचाकीचा डिक्कीत पाच किलो ४७८ ग्रॅम हिरवे कॅनाबिस गांजा वनस्पतीची पाने/फुले/बिया (गांजा) आढळून आल्यात.पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) कायद्या अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.या कारवाईनंतर पोलिस प्रशासनाने जिल्हातील इतर अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांवर अशाच प्रकारची धडक कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.