मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने अलीकडील सर्वांत मोठी कारवाई केली असून त्यांनी २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यामध्ये कोकेन, गांजा व कॅनेबीज या प्रकारच्या जवळपास २२ किलो अमली पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वरून एनसीबी मुंबईचे अभिनंदन केले आहे.











