छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा दिला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोठा झटका बसला. पक्षाच्या दहा माजी नगरसेवकांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये पालिकेच्या माजी सभापती, माजी सभागृह नेत्यांचा समावेश आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. कालच्या दिवसात ठाकरेंचे सहा खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा असतानाच संभाजीनगरमध्ये मात्र खरोखर धक्का बसला.











