लेखापाल किरण गरीबदास अहिरे, ३,०००/-रु लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.

आरोपी किरण गरीबदास अहिरे, लेखापाल, उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे वन विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन ३,०००/-रु लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः   पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु.

तकारदार हे बहाळ (रवाचे), ता.चाळीसगांव, जि. जळगांव येथील रहिवाशी असुन त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी मौजे गरताड ता. व जि.धुळे येथील शेतकरी यांच्या शेतात लागवड केलेल्या तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्याकरीता सदर गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकुड वाहतुकीची परवानगी मिळणेकरीता दि. २१.०२.२०२४ व २३.०२.२०२४ रोजी वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांचेकडे अर्ज केलेला होता.

सदरची परवानगी मिळणेकरीता तकारदार हे उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे येथे जावुन पाठपुरावा करीत होते. तेव्हा सदर कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देणेसाठी तकारदार यांचेकडे ३,०००/- रु. लाचेची मागणी केल्याची दि.१०. ०७.२०२४ रोजी तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे दिली होती.

सदर तक्रारीची आज दि.११.०७.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान लेखापाल किरण अहिरे यांनी तक्रारदार यांचेकडे ३,०००/- रु लाचेची मागणी करुन ३,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धुळे शहर पो स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

  • Related Posts

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!