संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या खुनाचं कारण अखेर समोर आलं आहे. ६ महिन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादामुळे मयताने आरोपीला मारहाण केली होती. हा राग मनात धरून आरोपींनी मयताला मैदानात बोलावून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने २ आरोपींना चिकलठाणा येथून अटक करण्यात आले असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली आहे.

गणेश विनोद सोनवणे (वय २७, रा. अंबर हील जटवाडा रोड) आणि अनिकेत उर्फ विक्की रमेश गायकवाड (वय २४, रा. एच.पी गल्ली, एकता नगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिनेश (ऊर्फ बबलू) परमानंद मोरे (वय २६, रा.चेतना नगर हर्सूल) असं मयत तरुणाचं नाव आहे. दरम्यान, जुना वाद मिटवायचा आहे, असं सांगून दिनेश (ऊर्फ बबलू) याला गणेश सोनवणे आणि अनिकेत गायकवाड यांनी सोमवार दि.२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेल समोरील एन १३ मैदानावर बोलावले. दिनेश तिथे जाताच आरोपींनी गळ्यात हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्यात दोघांनी दिनेश याच्या पोटात चाकूने भोसकले. इतर आरोपींनी बॅट, रॉडने बेदम मारहाण केली. यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण याने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याला देखील चाकूने भोसकले. यात सुमित गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, पोलीस उप निरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराने माहिती दिली. आरोपी हे चिकलठाणा येथील बाजारात असल्याचं गुप्त बातमीदाराने सांगितलं. त्यानंतर पथकाने आरोपींना अटक केली आणि आरोपींना बेगपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.