मुलासोबत बोलताना VIDEO काढले, मग धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार.

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एका ५६ वर्षांच्या नराधमाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दोन दिवसांपूर्वी भांडुपमधील एका शाळेत तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर ५६ वर्षांच्या नराधमाने वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी डी. एन. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. त्याच्याशिवाय या घटनेत त्याला साथ देणाऱ्या आणखी एकालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

५६ वर्षीय नराधमाने हा घृणास्पद प्रकार केला. विशेष म्हणजे त्याने यासाठी कट रचून अल्पवयीन मुलीला फसवलं आणि मग तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या आरोपीने अल्पवयीन पीडितेचे मित्रांसोबत बोलत असताना चित्रिकरण केले. हे व्हिडिओ कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. आरोपीने आधी पीडित मुलीला एका मुलासोबत मैत्री करण्यास भाग पाडलं. त्यानंतर ते दोघे बोलत असताना त्याने तिचे काही फोटो-व्हिडिओ घेतले. मुलासोबत बोलत असतानाचे व्हिडिओ किटुंबियांना दाखवेन अशी धमकी त्याने मुलीला दिली. याने पीडिता खूप घाबरली. आरोपीने तिला धमकी दे तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पण, नराधमाचा त्रास असह्य झाल्यानंतर अखेर अल्पवयीन पीडितेने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर डी. एन. पोलिसांनी पीडित आरोपी आणि त्याला साथ देणाऱ्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुपच्या एका नामांकित शाळेत १०-११ वर्षांच्या ३ विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. शाळेतील लिफ्ट मेकॅनिकने या मुलींसोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर या आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलं होतं. या लिफ्ट मेकॅनिकने मुलींना अश्लील इशारे केल्याचाही आरोप आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..