कंटेनर व रिक्षाचा भीषण अपघात : दोघांसह बालिका ठार तर दोन गंभीर.

राज्यातील नशिक जिल्ह्यातील घोटी- सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ कंटेनर व रिक्षात झालेल्या अपघातात दोघांसह बालिका ठार झाली, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत व जखमी कल्याणमधील नांदवली येथील असल्याचे समजते आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोटी-सिन्नर मार्गावर सोमवारी (दि. २०) सायंकाळी रिक्षा (एमएच 05 एफडब्ल्यू 0030) सिन्नरकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाने समोरून येणाऱ्या कंटेनरवर (एनएल 01 एएफ 0458) जाऊन धडकली. अपघातात रिक्षाचालक अमोल विनायक घुगे (२५, रा. नांदवली, कल्याण) हा जागीच ठार, तर स्वरा अमोल घुगे (४), मार्तंड पिराजी आव्हाड (६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रतीक्षा अमोल घुगे (२२) व कलावती मार्तंड आव्हाड (५८, रा. कल्याण) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसएमबीटीच्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघात प्रकरणी ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती (२८, रा. झारखंड) याला सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी पुढील तपासासाठी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या ताब्यात दिले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.सदर ठिकाणी झालेले अपघात स्थळ हे ब्लॅक स्पॉट नसून सदर अपघात हा रिक्षाचालकाने ओव्हरटेक केल्यामुळे झाला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली आहे. अपघातानंतर रस्त्यावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताबाबत वाडीवऱ्हे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

  • Related Posts

    जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !

    जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…