कोटी रुपयांचे बक्षीस असलेले १४ नक्षलवादी चकमकीत ठार .

देशातील छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्‍ह्यात झालेल्‍या चकमकीत १४ नक्षलवादी ठार आहेत. अद्‍याप चकमक सुरु आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्‍यान, १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादीही या चकमकीत ठार झाल्‍याचे छत्तीसगड पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे. छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी १४ नक्षलवाद्यांना ठार केले. मोठा शस्‍त्र साठाही जप्‍त करण्‍यात आले आहे. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात चकमक सुरुच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत.ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलींची चकमक झाली. संयुक्त आंतरराज्यीय कारवाई रात्री उशिरापासून सुरु हाेती,” असे ओडिशा पोलिसांनी एका म्‍हटलं आहे.

ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त ५ किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील कुलारीघाट राखीव जंगलात संयुक्त कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या १४ झाली आहे. “माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे,” असेही पोलिसांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे. मृत १४ नक्षलींमध्‍ये सोमवारी ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्‍या नक्षलवादीही ठार झाला आहे, अशी माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली. तसेच कोब्रा युनिटचा एका जवान जखमी झाला आहे. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “गुप्तचर विभागाने दिलेल्‍या माहितीच्या आधारे, ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सोमवारी (२० जानेवारी) रात्री नवापारा आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहिम राबवली. ही कारवाई ओडिशा आमच्या सीमेपासून सुमारे ५ किमी अंतरावर गरियाबंद येथे करण्यात आली. पहाटेच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी जप्त करण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोध मोहिम सुरु आहे.”

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.