वडील शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज, मुलीजवळ गेले असता काळजाचा थरकाप

दीपक पवार हे दौंड तालुक्यातील नानगांव येथील एका गुरहाळावर कामानिमित्त सहकुटुंबं वास्तव्यास आहेत. ते ऊसतोडीचे काम करतात. रविवारी सकाळच्या सुमारास हे सहकुटुंब पिकअपमध्ये बसून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले होते. पिकअप चालकाने गाडी शेतात असणाऱ्या कच्या रस्त्याला लावली होती.पुण्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकअप जवळ खेळत असताना गाडीचे चाक अंगावरून गेल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेहा दीपक पवार असं या चिमुकलीचं नाव असून सुनील दत्तात्रेय खळदकर असं पिकअप चालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दीपक सुरेश पवार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दीपक पवार हे दौंड तालुक्यातील नानगांव येथील एका गुरहाळावर कामानिमित्त सहकुटुंबं वास्तव्यास आहेत. ते ऊसतोडीचे काम करतात. रविवारी सकाळच्या सुमारास हे सहकुटुंब पिकअपमध्ये बसून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले होते. पिकअप चालकाने गाडी शेतात असणाऱ्या कच्या रस्त्याला लावली होती. तसेच त्याने गाडीला चावी तशीच ठेवून तो घरी निघून गेला. दीपक पवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत शेतात ऊस तोडत होते. नेहा त्यावेळी पिकअप जवळ खेळत होती.काही वेळाने तिचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. वडील दीपक यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, तिच्या अंगावरून पिकअप गाडीचे चाक गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या नेहाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं चाक अंगावरून कसे गेले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.