कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून तगादा, पुण्यात वेटरची नोकरी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल,

 लातूरमध्ये एका तरुणाने क्रेडिट कार्डच्या कर्जामुळे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.क्रेडिट कार्ड घेऊन त्याचे हप्ते अनेक ग्राहकांना फेडता न आल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र क्रेडिट कार्डच्या हप्त्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा दबाव आणि हप्ते भरता न आल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुशील बोलसुरे असं मृत तरुणाचं नाव आहे.सुशील बोलसुरे हा लातूर जिल्ह्यातील निलंगा तहसीलमध्ये येणाऱ्या सिंदखेड गावात राहणारा होता.

सुशील मूळचा सिंदखेडचा होता, पण पुण्यातील एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता. यावेळी त्याने एसबीआय बँकेतून क्रेडिट कार्डवर १ लाख २७ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण कर्ज परत न केल्याने एसबीआयचे बँक कर्मचारी सुशीलला फोन करुन कर्ज परत करण्यासाठी दबाव आणत होते. सुशीलला दररोज बँकेतून कॉल कर्ज परत करण्यासाठी कॉल येत असल्याने तो अतिशय त्रासला होता.सुशील क्रेडिट कार्डवर कर्ज घेतल्याची बाब त्याच्या मित्रांनाही समजली होती. यामुळे मित्रांमध्ये होणाऱ्या बदनामीमुळे तो मानसिक तणावात होता. याचदरम्यान तो पुण्यातून त्याच्या गावी सिंदखेडमध्ये एका उत्सवासाठी आला होता. गावी आल्यानंतरही त्याला सतत बँकेकडून कॉल येत होते. यालाच कंटाळून सुशीलने ६ जानेवारी रोजी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. क्रेडिट कार्डचे हप्ते भरता न आल्याने बँकेच्या सततच्या कॉल, कर्जाच्या ओझ्याखाली त्याने आयुष्याची अखेर केली.

या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी सुशीलचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी निलंगा शहरातील सरकारी रुग्णालयात पाठवला. या आत्महत्येप्रकरणी निलंगा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, क्रेडिट कार्डचं कर्ज फेडता न आल्याने, सतत येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या दबावाला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी मोठ्या मानसिक त्रासाचा सामना केला आहे. सुशील देखील याच मानसिक त्रासाला कंटाळून, कर्ज फेडता न आल्याने नैराश्यात गेला आणि टोकाचं पाऊल उचचलं. त्याच्या अशाप्रकारे जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.