जळगाव मध्ये हिंदूंच्या एकिकरणासाठी 12 जानेवारीला महाआरती आणि हनुमान चालीसा ! सनातनी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, तसेच किमान महिन्यातून एकदा सामूहिक उपासना होऊन देवतांचे आशीर्वाद मिळावेत या उद्देशाने प्रत्येक महिन्यातील एक रविवार महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण याचे आयोजन करण्यात येणार आहे, याचा शुभारंभ अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 12 जानेवारी या दिवशी करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्या नगर येथील श्री हनुमान मंदीरात सायंकाळी 7 वाजता हे आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मध्मातून करण्यात येत आहे.
नुकतेच जळगाव येथे बागेश्र्वर धाम सरकार यांच्या कथेतून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आणि सामूहिक उपासना यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिशा दर्शन केले. यासाठी फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी जळगाव शहरातील विविध भागातील एका मंदिरात असे सामूहिक उपासनेचे नियोजन करण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. यशवंत चौधरी यांनी सांगितले आहे.या वेळी महाआरती, हनुमान चालीसा यासोबत सामूहिक प्रार्थना आणि हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सामूहिक उपासनेला शहरातील जास्तीत जास्त सनातनी हिंदूंनी उपस्थित राहावे असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गजानन तांबट, आशिष गांगवे तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने सर्वश्री. नीलकंठ चौधरी, संजय दीक्षित, जयेश कुळकर्णी, संजय येवले आदींनी केले आहे.