नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना सोळा वर्षीय मित्राने आपल्या चौदा वर्षीय मित्राकडे मागणी केली. त्याने नकार दिला असता सोळा वर्षीय अनिरुद्ध कदम याने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना सोळा वर्षीय मित्राने आपल्या चौदा वर्षीय मित्राकडे मागणी केली. त्याने नकार दिला असता सोळा वर्षीय अनिरुद्ध कदम याने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या बेड्या ठोकल्या आहेत.
 पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश बाळू चुणारे हा इयत्ता आठवीत शिकत असून पेण तालुक्यातील फणस डोंगरी येथील रहिवासी आहे. पेण शहरातील एका खासगी शाळेत तो शिकत असून शुक्रवारी सकाळी ७ वाजता तो घरातून निघाला होता. ११ वाजता तो घरी परतलाही. पुन्हा दुपारी अडीचच्या सुमारास तो आई ज्याठिकाणी बांगड्या विक्रीचा व्यवसाय करीत होती तिथे जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि त्यांना तो दिला. त्यानंतर तो रात्री नऊ वाजेपर्यंत घरी न परतल्याने पेण येथील बाजारात तसेच इतर ठिकाणी त्याची शोधाशोद केली, मात्र मिळाला नाही.
तर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता गणेश याला बाजारात शोधत होतो तेव्हा फणस डोंगरी येथे राहणारा वेदांत म्हात्रे यांनी सांगितले की, गणेश याचा मृतदेह हा कासार तलाव जवळ भेटला आहे. त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तात्काळ वेदांत मोटरसायकलवरून घटनास्थळी धावले आणि तेथे असलेल्या झाडीझुडुपात गणेश मृतदेह सापडला.पोलिसांनी असेही सांगितले की, गणेश नियमित शाळेत जात नव्हता. तर वाडीतील मित्र जतीन, अमन, अनिरूध्द व सुरज नावांच्या मुलांसोबत नेहमी फिरत राहत होता. गणेश व त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचे, बॉड म्हणजे चप्पलला लावायचे सोल्युशन व गांजा सिगारेट पिण्याचे व्यसन जडले होते. गणेश याच्या हत्येची तक्रार पेण पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलि‍सांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्र वेगाने सुरु केली.याप्रकरणी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले. पोलिस पथकाने लावलेल्या सापळ्यात आरोपी अनिरुद्ध कदम हा अडकला. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. कबुलीत त्याने म्हटले होते की, गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशाची गरज होती. मी गणेशकडे पैसे मागितले असता त्याने मला दिले नाही. म्हणून मी त्यास धक्का दिला असता तो झाडी झुडपात पडला. त्यावेळी त्याच्या डोक्यास लाकडाचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला असावा. याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उप विभागीय अधिकारी गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत.
  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.