कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग, मोठे नुकसान, नागरिकांमध्ये घबराट

 मुंबईच्या कुर्ला पश्चिमेतील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आलीये. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती नाहीये. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे मोठे प्रयत्न केले. सुदैवाने या आगीत जीवितहानी नाहीये.एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. कुर्ल्यात भीषण आगीची घटना घडली. एका हॉटेलमध्ये ही आग लागली. या आगीच्या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिमेतील हॉटेल रंगूनमध्ये ही आग लागली. ही आग इतकी जास्त भीषण होती की, हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल काही माहिती ही मिळू शकली नाहीये.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यास अग्निशमन दलाला मोठे प्रयत्न करावी लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच लोकांनी देखील मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे लोळ दूर दूरपर्यंत दिसत होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आगीमुळे संपूर्ण परिसरात धूर मोठ्या प्रमाणात झालाय. एक सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवतहानी झाली नसल्याची माहिती मिळतंय.या आगीमध्ये दोन ते तीन गाळे जळून खाक झाली आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन जवांनाना शर्यतीचे प्रयत्न करावे लागले. ही आग रात्रीच्या वेळी लागली होती. कुर्ला पश्चिमेतील भागात लोकांची वर्दळ कायमच असते. त्याच भागात आग लागल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आग लागलेल्या ठिकाणी लोक हे मोठ्या संख्येने दिसत आहेत.आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथे अग्निशमन दल पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमध्ये ही आग अजून पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. आता ही आग नेमकी कशाने लागली याचा शोध हा घेतला जातोय. या आगीच्या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे देखील सांगितले जातंय. लवकरच आग नेमकी कशाने लागली, याची माहिती स्पष्ट होईल.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.