नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.नारायणपुर एक ऐतिहासिक गाव नंदुरबार शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर, नंदुरबार,
करणखेडे, नारायणपुर असा मार्ग पुढे धानोरा गावाकडे जातो, नारायणपुरची गढी ही नंदुरबारच्या पश्चिमेस आहे, शिवण नदीच्या काठावर गावाभवतीचा कोट प्राचिन असल्यामुळे जाणवते, या कोटाच्या आत गढी आहे, चौकोनी आकाराचा कोट नदीच्या काठावर तीन एकर परिसरावर आहे, चार टोकाला चार बुरुज अशी त्यांची रचना आहे, दक्षिणेकडील तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली आहे, इतर तीन बाजुंची 7 ते 8 फुट उंचीची तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली आहे, इतर बाजुंची तटबंदी थोडीच शिल्लक आहे.
कोटाच्या आत गावाची वसाहत विस्तारल्याने आतील प्राचीन वस्तु नष्ट झाल्या आहेत, एका चौथऱ्यावर मारुतीचे जीर्णोधार केलेले मंदिर आहे, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कोटाच्या दक्षिणेकडील तटबंदीत मुख्य भव्य दरवाजा होता, उत्तरो एक नदीच्या दिशेने एक असे दोन लहान दरवाजे होते, कोटातील वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोटाच्या बाहेरील बाजुस ओढयावर जुना दगडी बंधारा बांधलेला होता, मुख्य प्रवाहाला बांध घालुन पाणी अडवुन नंतर दुसरा लहान बंधारा घालुन पाणी कोटाकडे वळविले आहे, नारायणपुर येथे 11 व्या शतकात उभारलेले सुंदर विष्णुचे मंदिर आहे, मुर्ती अतिशय विलोभनीय आहे. श्री विष्णु नारायणाच्या मंदिरामुळे या गावाला नारायणपुर हे नाव पडले असेल, या मंदिरा भोवती अनेक भग्न मूर्त्या पडलेल्या आहेत, या सर्व विषयासंदर्भात आज मंदिर परिसरात अष्टवक्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या मंदिरात संदर्भातील सर्व माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पुढे सांगताना सांगितले की, दोन शिलांवर कोरीव लेख ही कोरलेले आहेत ते दुर्देवाने फारच पुसट झाले आहेत,
नारायणपुराला   विष्णु नारायणाचे व  शिवशंकराची एकाच ठिकाणी ही मंदिरे असणे वैशिष्टयपुर्ण म्हटले पाहिजे, भारवाहक यक्षाची बरीच शिल्पे येथे आजही चांगल्या स्थितीत नदीत दुरपर्यंत विखुरलेली आहेत, त्या भारवाहक यक्षाच्या शिल्पांवरुन येथे मोठे मंदिर होते, तसेच सुटे शिल्पे येथे आहेत, नदीतही इतर शिल्पे व मृत्या आहेत, त्यावरुन असे अनुमान काढता येते कि, येथे मंदिराचा समुह होता, नैसर्गिक आपत्तीमुळे, पुरामुळे मंदिराचे नुकसान झाले, हि सर्व शिल्पे, मुर्त्यां शोधून ती एकत्र करुन नविन मंदिरांची उभारणी करता येईल, उत्खनन केल्यास इतरही आवशेष आपल्याला मिळतील तसेच शिलालेखही मिळुशकतील, मंदिराच्या परिसरात नंदुरबारचे कानूगो देसाई यांची शेती आहे, या परिसराच्या शास्त्रशुध्द पध्दतीने अभ्यास केल्यास, अनेक गोष्टीचा उलगडा होईल याचा जिर्णोधार झाल्यास हे मोठे पर्यटन स्थळ होईल, सरकारने व सुज्ञ गावकऱ्यांनी येथील मंदिराचे व शिल्पाचे जतन, संवर्धन केल्यास आपला सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वारसा वृध्दींगत होईल व पर्यटनास चालना मिळेल, असे सांगण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेस इतिहासतज्ञ प्राचार्य डॉक्टर सर्जेराव भामरे, टिनू आप्पा मराठे, ग्रामविकास अधिकारी सी आर करोडीवाल, उपसरपंच सतीश वळवी, पोलीस पाटील रमेश पाडवी, मंदिर शिल्पकार राजाभाऊ गायकवाड, सेवानिवृत्त अभियंता जीबी लोखंडे उपस्थित होते.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.