टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूकदार तक्रारीसाठी गर्दी करीत असून, मुंबईत आतापर्यंत जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत.दामदुप्पट परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणाऱ्या ‘टोरेस’विरुद्ध तक्रारदारांचा ओघ सुरूच आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूकदार तक्रारीसाठी गर्दी करीत असून, मुंबईत आतापर्यंत जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत.‘टोरेस’ या नावाने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये ब्रँड सुरू केला. गुंतवणूकदारांना कृत्रिम खडे आणि प्रत्येक आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. काही आठवड्यांनंतर परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि सोमवारी दादर येथील शाखेत गोंधळ उडल्यानंतर पैसे बुडाल्याचे वृत्त सर्वदूर पसरले.
शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संचालक सर्वेश सुर्वे, व्यवस्थापक उझबेकिस्तानी नागरिक तानिया, रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर यांना अटक केली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख ऊर्फ कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवलेंका फरार आहेत. पोलिसांकडून अटक आरोपींची निवासस्थाने आणि ‘टोरेस’च्या सर्व शाखांमध्ये झाडाझडती अद्याप सुरूच असून, आतापर्यंत नऊ कोटींचा ऐवज हस्तगत केला आहे.जास्त रकमेची गुंतवणूक करणाऱ्या, तसेच गुंतवणूकदार आणणाऱ्या एजंटना ‘टोरेस’ने काही कार बक्षीस म्हणून दिल्या होत्या. पोलिसांनी चौकशीदरम्यान १४ कारबाबत माहिती मिळवली आहे. ज्यांच्याकडे ही वाहने आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. इतकेच नाही तर ‘टोरेस’च्या दादर येथील शोरूमबाहेर ठेवण्यात आलेली कार जवळच्या एका शोरूमधून ११ हजार रुपये भाड्याने घेण्यात आली होती. जास्त व्यवसाय केल्यास अशी कार दिली जाईल, असे प्रलोभन ग्राहकांना दाखवले जात होते.शोरूमचे भाडे २५ लाख गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘टोरेस’ने दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोर मोक्याच्या जागेवर आलिशान शोरूम सुरू केले होते. तपासामध्ये त्यांनी ही जाग भाडेतत्त्वावर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ लाख रुपये प्रतिमहिना भाडे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस जागेच्या मालकाकडे अधिक चौकशी करणार आहे.
  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..