वाहनचालकांची आता खैर नाही! ‘दादा, भाऊ, साहेब, सरकार,…’ फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्यांवर पोलिस करणार कारवाई

 अनेकांना आपल्या वाहनांवर आकर्षक नंबर प्लेट्स लावण्याची हौस असते. परंतु अशा नंबर प्लेट्समुळे वाहतुक पोलिसांचा गोंधळ उडतो. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करतांना अस्पष्ट किंवा लगेच लक्षात न येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट्समुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण होतो. शिवाय नागरिकांंमध्येही संभ्रम निर्माण होतो.धुळे शहरातील कालिका माता चौक परिसरात फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबविली या मोहिमेदरम्यान दुपारपर्यंत जवळजवळ २८ ते ३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
अनेकांना आपल्या वाहनांवर आकर्षक नंबर प्लेट्स लावण्याची हौस असते. परंतु अशा नंबर प्लेट्समुळे वाहतुक पोलिसांचा गोंधळ उडतो. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करतांना अस्पष्ट किंवा लगेच लक्षात न येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट्समुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण होतो. शिवाय नागरिकांंमध्येही संभ्रम निर्माण होतो.गेल्या काही दिवसांपासून शहरात पोलीस, महाराष्ट्र शासन आणि विविध पदनामांचा गैरवापर करून फॅन्सी नंबर प्लेट्स लावलेल्या गाड्यांचा वावर वाढल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.

कारवाईदरम्यान, अशा फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणाऱ्या अनेक वाहनांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनचालकांवर दंड लावून त्यांचे नंबर प्लेट्स जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा वचक बसला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस नाईक विनायक सैंदाणे, हेड कॉन्स्टेबल भागवत पाटील, भूषण शेट्टी, तोफिक शेख, पोलीस कॉन्स्टेबल विलास मालचे, नितीन उतारे, प्रसन्न पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. फॅन्सी नंबर प्लेट्सचा वापर हा कायद्याच्या चौकटीत बसत नसून, अशा प्रकारचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.