जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा ने कसली कंबर.येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी च्या नेत्यांनी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे. त्या अनुषंगाने काही दिवसापासून जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या नेतृत्व खाली जळगाव शहरातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी चे प्रथम सदस्य म्हणून नोंदणीचे काम मोठ्या जोमाने हाती घेतले आहे.
त्या अनुषंगाने काल दिनांक 8 जानेवारी रोजी पिंप्राळा येथे बुधवार बाजार चे अवचित्त साधून भारतीय जनता पार्टी मंडळ क्रमांक पाच पदाधिकाऱ्यांनी प्रथम सदस्यता अभियान राबविण्यात आले. किमान 500 महिला व पुरुषांनी सदस्यत्व घेतली. त्यानिमित्त महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे माजी नगरसेविका शोभाताई बारी अतुल बारी मंडळ अध्यक्ष शक्ति महाजन भारतीय जनता पार्टीचे आशिष सपकाळे राहुल पाटील राजू डोंगरे खुशाल ठाकूर हरिओम सूर्यवंशी पदाधिकारी उपस्थित होते