घरी परतताना घात, अज्ञात वाहनाची बाईकला धडक; भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा अंत

जलब येथील अक्षय बबन अवचार आणि महादेव अवचार, रामदास अवचार हे आपल्या दुचाकीने पारखेडवरुन जलबकडे परत येत असताना त्यांच्या दुचाकीला पारखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या दोन सख्खा भावांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्रथम खामगाव व पुढील उपचाराकरता अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील जलब राष्ट्रीय महामार्गावर पारखेड फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये जलब येथील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरता भरती करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना महादेव अवचार आणि रामदास अवचार या दोन सख्ख्या भावांची अखेर प्राणज्योत मालवली.

जलब येथील अक्षय बबन अवचार आणि महादेव अवचार, रामदास अवचार हे आपल्या दुचाकीने पारखेडवरुन जलबकडे परत येत असताना त्यांच्या दुचाकीला पारखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या दोन सख्खा भावांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्रथम खामगाव व पुढील उपचाराकरता अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.दुचाकी चालक अक्षय बबन अवचार यांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने जलब गावावर शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.