११ टक्के परताव्याचं आमिष, लोकांनी लाखो गुंतवले अन् टोरेसचं ऑफिस रातोरात बंद

संशयास्पद गुंतवणूक योजनेतून फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सोमवारी दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील टॉरेस ज्वेलरीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली गुंतवणूक योजनेतून फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सोमवारी दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील टॉरेस ज्वेलरीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. दर आठवड्याला ११ टक्क्यांपर्यंत परताव्याच्या ऑफरसह हजारो लोकांना आमिष दाखवल्यानंतर अचानक पेआऊट बंद केल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे.

संशयास्पद पॉन्झी योजनेतून फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सोमवारी दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील टॉरेस ज्वेलरीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. कंपनीने हजारो जणांना दर साप्ताहिक ११ टक्क्यांपर्यंत ऑनलाइन रिटर्न्स सोबतच आकर्षक बक्षिसं आणि रेफरल्ससाठी २०% बोनस ऑफरचे आमिष दाखवले आणि नंतर अचानक पेआऊट बंद केल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले.

टॉरेस ब्रँड ही प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड चालवत असल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांचे संचालक सर्वेश सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोव्हलेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, महाव्यवस्थापक तानिया कास्तोवा आणि स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना कुमार यांच्याविरुद्ध फसवणूक आणि एकूण १३.५५ कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रदीपकुमार वैश्य (३१) या भाजी विक्रेत्याच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रदीपकुमार वैश्यने दावा केला की, २१ जून ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान आरोपींनी त्याच्यासह इतर अनेकांना आकर्षक परताव्याच्या आश्वासनासह मोजोनाइट स्टोनमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रलोभन दाखवले.

सुरुवातीचे पैसे दिले असताना, ३० डिसेंबरनंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत. आरोपी देश सोडून पळून गेल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे. ‘व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीने आमचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले आहे, परंतु आम्हाला खात्री नाही’ असे एका आंदोलकाने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने टॉरेसच्या नंबरवर कॉल केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.