भडगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद

भडगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद भडगाव परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली. या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत भडगाव पोलिस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे, पो.कॉ.ईश्वर पाटील, सागर पाटील व पथकातील कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने केली.


मिळालेल्या माहितीनुसार, पो.कॉ.सागर गुलाब पाटील नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी आकाश झुंबर कांबळे (वय २४, रा.वरची बर्डी, यशवंतनगर, आयमरीमाता मंदिराजवळ भडगाव) आणि दुसरा आरोपी शुभम भास्कर जौणे (वय २७, रा. महादेव मंदिराजवळ कजगाव रेल्वे स्टेशन शेजारी, कजगाव ता.भडगाव) यांच्या जवळ २५,००० रू. किमतीची एक गावठी बानावटीची पिस्टल तीस लोखंडी मॅग्झिन असलेली समोर गोल बैरल व मुठीत बाजूस तपकिरी रंगाची प्लेट व त्यावर चांदणीची आकाराची नक्षी असलेली गावठी कट्टा आढळला. शुभम भास्कर जौणे याने परिसरात दहशत माजवत गावठी बनावटीचे पिस्टल विना परवाना बाळगत सदरचे पिस्टल हे विना परवाना आकाश झुंबर कांबळे याला आर्थिक फायद्याकरीत विकले. याप्रकरणी वरील दोघा आरोपींविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. ०६/२०२५ शस्त्र अधि. कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.