कोयत्याचा धाक दाखवून १७ वर्षीय मुलीला…. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत

संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यात पुणे पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यातच कोयता गॅंगची दहशत कुठेही कमी होताना दिसत नाही. अशातच, पुण्यात तीन ठिकाणी कोयत्याने वार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, छोटे-मोठे सराईत गुन्हेगार आणि काही मोठे गुन्हेगारही येथे आश्रय घेत आहेत. संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यात पुणे पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यातच कोयता गॅंगची दहशत कुठेही कमी होताना दिसत नाही. अशातच, पुण्यात तीन ठिकाणी कोयत्याने वार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यापैकी बिबवेवाडी येथील घटना भयानक स्वरूपाची आहे. या हल्ल्यात एकाचा पंजा हातापासून तुटून वेगळा झाला आहे. अधिक शुल्क भरण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका विधीसंघर्षित गुन्हेगाराला आणि त्याच्या मित्र सुरज सरोज (रा. वडकी नाला, फुरसुंगी, उरळी देवाची) याला अटक केली आहे. तर पियुष पाचपुडे (वय २२, रा. सुपर इंद्रायणी नगर) याचा भांडणात पंजा तुटला आहे. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या गौरव मरकड (वय २४, रा. सुपर इंद्रायणी नगर) याच्यावरही गंभीर वार करण्यात आले आहेत.

ही घटना काल दुपारी साडेचारच्या सुमारास शिवतेज क्रीडा संघ चौक, सुपर इंद्रायणी नगर येथे घडली. याशिवाय, हनुमान टेकडी येथे फिरायला गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांवर कोयत्याने वार झाल्याचेही उघड झाले आहे.गेले अनेक दिवस पियुष आणि अल्पवयीन आरोपी यांच्यात बघण्याच्या वादातून खुन्नस होती. काल अल्पवयीन आरोपीने सुरज सरोज याला बोलावून घेतले आणि पियुषवर थेट वार केला. वार चुकवण्यासाठी पियुषने हात पुढे केला असता, त्याचा पंजा तुटला. पियुषला वाचवण्यासाठी आलेल्या गौरव मरकडवरही हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या हात-पायाला गंभीर जखम झाली. या घटनेत पियुषला पंजा गमवावा लागला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.