निर्दयीपणे संपवलं, हाता-पायाची दोन बोटं कापली; लेकाची बॉडी पाहून आईचा मन हेलावणारा आक्रोश

 एक चिमुकला खेळता खेळता अचानक गायब झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. या चिमुकल्याच गळा चिरण्यात आला होता. तसेच, त्याच्या हाता आणि पायाची देन बोटंही कापण्यात आली होती.एका ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिमुकल्याला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आलं आहे. आधी गळा आवळण्यात आला मग त्याचा गळा कापला. इतकंच नाही तर एका हाताची आणि एका पायाची प्रत्येकी दोन बोटंही कापली आहेत. बिहारच्या नालंदा येथे ही अगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हे प्रकरण नालंदाच्या नूरसरायच्या डोईया गावातले आहे. परिसरातील मोबाईल टॉवरजवळील भाताच्या ढिगाऱ्यात या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता.

मृत दीपांशु पासवान याचे वडील सोनू पासवान यांनी सांगितले की, दीपांशु रविवारी दुपारी खेळण्यासाठी घरातून निघाले होता. संध्याकाळी थंडी वाढली त्यामुळे दीपांशूची आई स्वेटर घालायचं म्हणून त्याला शोधू लागली. संध्याकाळची रात्र झाली तरी दीपांशू सापडला नव्हता.आपल्या मुलासोबत काही अनुचित प्रकार घडला असावा, अशी भीती कुटुंबीयांना सतत वाटत होती. म्हणून ते पुन्हा त्याचा शोध घ्यायला निघाले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सायंकाळी गावापासून काही अंतरावर असलेल्या टॉवरजवळील पेंढ्याच्या ढिगाऱ्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.

तेव्हा घटनास्थळी गावातील इतर मुले खेळत होती.दिपांशूचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिस चौकशीत दीपांशुच्या वडिलांनी गावात कोणाशी कोणत्याही प्रकारचा वाद असल्याचे नाकारले.याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एफएसएल आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून ते या घटनेचा तपास करत आहेत. एसपी भरत सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खुनाचा उलगडा होणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.