पत्रकार मुकेश चंद्राकरच्या डोक्यावर १५ निशाण, लिव्हर कापलं; निर्घुणपणे संपवून सेप्टीक टॅंकमध्ये, प्रकरणात आणखी एकाला अटक

पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. पत्रकाराला अतिशय क्रूरपणे मारल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यासह देशभरात संताप व्यक्त होत आहे.छत्तीसगढमधील बीजापूरच्या पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असलेला कंत्राटदार, आरोपी सुरेश चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे. SIT ने ६ जानेवारी २०२५ रोजी त्याला हैदराबादमधून अटक केली. बीजापूर पोलीस दलातील SP जितेंद्र यादव यांनी याबाबत माहिती दिली. आरोपीच्या पत्नीला देखील कांकेर जिल्ह्यातून अटक केली आहे.

दोन दिवसांपू्र्वी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येसंदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली होती. ४ जानेवारीला आरोपी सुरेश चंद्राकरसह त्याचा भाऊ रितेश आणि दिनेश चंद्राकर यांच्यासोबत सुपरवायजर महेंद्र रामटेके याला अटक केली होती. त्याच दिवशी पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा पुढील तपास करण्यासाठी बीजापुरच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना देखील केली होती.१ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या ३३ वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर, यांचा मृतदेह चट्टानपाडा परिसरातील कंत्राटदार, आरोपी सुरेश चंद्राकर याच्या घराजवळच्या सेप्टीक टॅंकमध्ये सापडला होता.आरोपींनी मुकेश चंद्राकर यांच्या डोक्यावर, तसंच पाठीवर, छातीवर आणि पोटावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मुकेश चंद्राकर यांच्या शरीराच्या अंतर्गत भागांना अत्यंत वाईटरित्या कापून टाकले. त्यानंतर आरोपींनी मृतदेह सेप्टीक टॅंकमध्ये फेकून दिला. या हत्याकांडानंतर आरोपी सुरेश चंद्राकर फरार झाला होता.

पोलिसांनी सुरेश चंद्राकरची बॅंक खाती गोठवली. शिवाय, सरकारी जागेवर त्याने अवैधरित्या बनवलेल्या कन्स्ट्रक्शन डंपिंग यार्डवर देखील प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला. अशातच SIT च्या टीमला फरार आरोपी सुरेश चंद्राकर हैदराबादमध्ये असल्याची खबर लागली. त्यानुषंगाने SIT टीमने जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३०० पेक्षा अधिक कॉल रेकॉर्डस् तपासले. त्यानंतर ६ जानेवारी २०२५ ला आरोपी सुरेश चंद्राकरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.२२ डिसेंबर २०२४ ला पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी खराब रस्त्याच्या निर्मितीवर एक बातमी केली होती. आणि त्या रस्त्यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारासाठी कंत्राटदार आरोपी सुरेश चंद्राकरवर आरोप केले होते. मृत पत्रकार मुकेश चंद्राकर आणि आरोपी सुरेश चंद्राकर एकमेकांचे दूरचे नातलग आहेत.१ जानेवारीला आरोपी सुरेशचा भाऊ रितेश चंद्राकरने रात्री ८ च्या सुमारास मुकेशला आरोपी सुरेश चंद्राकरच्या घरी भेटण्यासाठी बोलावले. रात्रीच्या जेवणादरम्यान रितेशने मुकेशला, “आपण एकमेकांचे नातलग आहोत. तु सहकार्य करायचं सोडून आरोप का केलेस?” असं विचारल्यावर दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रितेशने सुपरवायजर महेंद्र रामटेकेसोबत मिळून निर्घृणपणे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.