कॉलेजला जाताना काळाचा घाला, बाईक खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

लोणंद पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळुपाटलाचीवाडी येथील विशाल दौलत धायगुडे (वय २७) हे मोटारसायकल ( एच एच ११ बीएफ ६८३) वरून जेजुरी एमआयडीसीमध्ये सकाळी कामावर निघाले होते. त्यावेळी नीरा येथे शाळेत निघालेल्या अंकिता अनिल धायगुडे व सानिका विलास धायगुडे (वय १८, दोघीही रा. बाळु पाटलाची वाडी, ता. खंडाळा) त्यांना मोटारसायकलवर बसवून ते नीरेकडे कॉलेजला निघाले होते.

खंडाळा तालुक्यातील लोणंद – नीरा रस्त्यावर नीरा उजव्या कालव्याजवळ काही अंतरावर माणिक सोना हिन्दुस्थान पेट्रोल पंपासमोर डांबरी रस्त्यावर असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामुळे एका मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवर बसलेल्या इयत्ता बारावीत शिकणारी विद्यार्थिनी अंकिता अनिल धायगुडे (वय २० रा. बाळु पाटलाची वाडी, ता. खंडाळा) ही जागीच ठार झाली, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  लोणंद पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळुपाटलाचीवाडी येथील विशाल दौलत धायगुडे (वय २७) हे मोटारसायकल ( एच एच ११ बीएफ ६८३) वरून जेजुरी एमआयडीसीमध्ये सकाळी कामावर निघाले होते.

त्यावेळी नीरा येथे शाळेत निघालेल्या अंकिता अनिल धायगुडे व सानिका विलास धायगुडे (वय १८, दोघीही रा. बाळु पाटलाची वाडी, ता. खंडाळा) त्यांना मोटारसायकलवर बसवून ते नीरेकडे कॉलेजला निघाले होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाडेगावजवळील माणिक सोना पेट्रोल पंपासमोर आल्यावर त्यांची मोटारसायकल रस्त्यात असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाला. त्यात इयत्ता बारावीत शिकणारी अंकिता अनिल धायगुडे ही मुलगी जागीच ठार झाली. तर मोटारसायकलस्वार विशाल दौलत धायगुडे व इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी सानिका विलास धायगुडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लोणंद येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर अधिक उपचारासाठी पुण्याला हलविले आहे.

दरम्यान, लोणंद नगरपंचायतीच्या पाईपलाईनची गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे तसेच महामार्गावर कोणत्याही प्रकारचे बॅरेकेट अथवा धोकादायक सूचना न लावल्याने हा अपघात झाला आहे, असा आरोप करत लोणंद नगरपंचायत, संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच बाळुपाटलाचीवाडी ग्रामस्थांनी लोणंद येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक चौकात रास्ता रोको अंदोलन केले. त्यामुळे नीरा, फलटण, सातारा, शिरवळ व खंडाळा बाजूकडून येणारी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलिस निरिक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा करून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार बाळुपाटलाचीवाडी येथील नवनाथ तुकाराम धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास लोणंद पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.