ओझरमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, ७ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न,

आकांक्षा विजय मंडलिक असे विवाहितेचे नाव आहे. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा तिच्या घरासमोरील विहिरीत मृतदेह आढळून आला. सासरच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप, विवाहितेच्या माहेरकडील नातेवाइकांनी केला. आकांक्षा विजय मंडलिक (वय २६, रा. बाणगंगा नगर, मंडलिक वस्ती) असे विवाहितेचे नाव आहे. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.

वैभव चंद्रभान जगझाप (वय ३४, रा. पालखेड मिरचीचे) यांच्या फिर्यादीवरून आकांक्षाचा पती विजय पुंडलिक मंडलिक, सासरे पुंडलिक राजाराम मंडलिक, सासू ठकूबाई पुंडलिक मंडलिक आणि नणंद सुवर्णा पुंडलिक मंडलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सासरकडील व्यक्तींनी लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आकांक्षाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला मारहाण करून माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावण्यात आला.सासरकडील मंडळींनीच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आकांक्षा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरकडील व्यक्तींनी ४ जानेवारी रोजी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. वैभव जगझाप यांच्या फिर्यादीवरून ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक तुषार गरुड अधिक तपास करीत आहेत.पिंपळगाव बसवंत बसस्थानकातून वृद्ध महिलेची दोन तोळ्याची पोत चोरीला गेल्याची घटना घडली. शिरसगाव येथील सुमनबाई सुकदेव मोरे या कामानिमित्त निफाड येथे गेल्या होत्या. तेथून शिरसगावी परत येत असताना पिंपळगाव बसवंत येथे बसची वाट पाहत असताना त्यांची २१ ग्रॅमची पोत चोरीला गेली. पोत बॅगेत ठेवलेली असल्याने घरी गेल्यानंतर पोत चोरीला गेल्याचे सुमन मोरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना सर्व प्रकार सांगितला. याविषयी पिंपळगाव पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथे काही महिलांची टोळी असून, या महिला निफाड फाटा ते बसस्थानक दरम्यान फिरतात आणि वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक यांना हेरतात आणि त्यांच्याकडील दागिने, पैसे चोरतात, अशा अनेक तक्रारी येत पोलिसांकडे येत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.