जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी…..

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पत्रकार दिवसाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज नंदुरबार शहरातील पत्रकार भवन येथे पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक नंददर्शनचे मुख्य संपादक सूर्यभान आबा राजपूत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे ,दैनिक लोकमतचे मनोज शेलार ,वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी, दिव्य मराठी चे जीवन पाटील, एम डी टीव्ही चे धर्मेंद्र पाटील, दैनिक पुण्यनगरी चे अविनाश भामरे ,एबीपी माझाचे भिकेश पाटील, दैनिक नंददर्शन चे सदाशिव राजपूत ,साप्ताहिक पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त समन्वयक विशाल मोहन माळी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे समन्वयक विशाल मोहन माळी यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाला सर्व दैनिकांचे प्रतिनिधी , इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी साप्ताहिकांचे प्रतिनिधी,युट्युब चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपला महाराष्ट्र चे जिल्हा प्रतिनिधी रंणजीत राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन दैनिक पुण्यनगरी चे अविनाश भामरे यांनी मानले…

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.