फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर यासंबंधी चित्र स्पष्ट होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आज, मंगळवार ७ जानेवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर यासंबंधी चित्र स्पष्ट होणार आहे. आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात दिल्ली काबीज करण्यासाठी लढत होणार आहे.