महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांची टेस्ट पॉझिटिव्ह, कुठल्या शहरात आढळले रुग्ण?

नागपुरात एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन लहान मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. दोन लहान मुलं एचएमपीव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. एक ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ३ जानेवारीलाच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. हे एचएमपीव्हीचे राज्यातील पहिले दोन रुग्ण आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करुन घेण्याची गरज भासली नाही. या दोघांनाही घरीच उपचार देण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही मुलांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती आहे.भारतात सोमवारी (६ जानेवारी) मुलांमध्ये मानवी एचएमपीव्ही संसर्गाची सात प्रकरणं नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत असताना – बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबादमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितले की प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे कोविड सारखा उद्रेक होणार नाही.”एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. तो २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आणि तो अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे”, असं नड्डा म्हणाले.राजस्थानमधील डुंगरपूर येथील एका दोन महिन्यांच्या बालकाला २४ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात श्वसनाच्या आजाराने दाखल करण्यात आले होते आणि २६ डिसेंबर रोजी एचएमपीव्हीचे निदान झाले होते. नागपुरातील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांची मुलगी अशा दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
रुग्णालयाने प्रकरणे नोंदवली असली तरी, नागपूर महानगरपालिकेने एम्स नागपूर येथे नमुने पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी ICMR व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या प्रकरणांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.