3 जानेवारी सावित्रीबाई फुले व 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचे जयंती सप्ताह उत्सव निमित्त अलौकीक कार्या बद्दल कर्तूत्ववान महिलांचा सन्मान स्वावित्रीमाई उत्सव निमित्त भूसावळ तालुका तहसिलदार निता लबडे यांचा सत्कार संपन्न झाला .

6 जानेवारी सोमवार रोजी भुसावळ तहसिल कार्यालयात वंदना चौधरी यांचे हस्ते चंद्रकांत चौधरी अध्यक्ष दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण ता . रावेर स्थापना (1917 ) संचालक दिनेश पाटील , प्रा . कमलाकर चौधरी , प्रा .संजय चौधरी यांनी संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह शॉल ,श्रीफळ , बुके देवून सत्कार केला .तहसिलदार निता लबडे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेवून आलेल्या कठीन प्रश्नांचा प्रभावी शिक्षण घेत संघर्ष करून या .पदापर्यंत पोहचल्या . उडान सिरियल आधारे प्रेरणा घेवून जिद्द चिकाटी तसेच प्रभावी संभाषण कौशल्याच्या आधारे गतीमान प्रशासनावर त्यांचा नेहमी भर असतो . सोशल मिडियाचा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेरण्यासाठी फायदा करून घ्यावा . कठीन परिश्रम करून वेळेत करीयर पूर्ण करा असा संदेश दिला . सवित्री उत्सव निमित्त केलेल्या सत्कार उपक्रमाचे कौतुक केले . 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत अशा अलौकीक कार्य करणारया महिलांचा सन्मान केला जाणार आहे .










