समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना

समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ‌
जळगाव (दि.०४/०१/२०२५) राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट ,राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,व प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे .त्या अंतर्गत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांना आज दि ४ रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उत्साहात प्रारंभ झाला आहे.

दि ४ व ५ या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नाशिक,जळगाव, धुळे ,मुरबाड व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत‌. या स्पर्धांमध्ये सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन ,हॉलीबॉल, तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर धावणे,टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, या खेळांचा समावेश आहे. समाज कल्याण नाशिक विभागातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

प्रादेशिक उपायुक्त कार्यालय नाशिक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव ‌ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.आज रोजी सदर स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश प्रियदर्शनी मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.