पारोळा तालुकास्तरीय उल्लास मेळाव्याचे आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…
पारोळा – देशातील १५ वर्षे आणि त्याहुन अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण देणे, ज्यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्थ असलेले विषय यांचा समावेश असल्याने या विषयांबाबत निरंक्षरामध्ये जागृती घडवुन आणणे. वय १५ वर्षे आणि त्याहुन अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभुत साक्षरता (वाचन, लेखन)
संख्याज्ञान, महत्वपुर्ण जीवनकौशल्य, व्यावसायिक कौशल्य, मुलभुत शिक्षण व निरंतर शिक्षण इत्यादी घटकांचा विकास स्वयंसेवक व शाळांच्या माध्यमाने केला जात आहे. त्यासाठीच आज पंचायत समिती, शिक्षण विभागाकडुन उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय उल्लास मेळाव्याचे पारोळा शहरातील बोहरा सेंट्रल स्कुल येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उद्घाटन सोहळा आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
प्रसंगी बोहरा सेंट्रल स्कुलचे चेअरमन तथा मा.नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, पंचायत समितीचे गटविकासअधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसिलदारांचे प्रतिनिधी, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, अधिक्षक यांचेसह उल्लास मेळाव्यात सहभाग नोंदविलेले शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी व आदी मान्यवर उपस्थित होते.