छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, सात जवान शहीद; IED ब्लास्टने लष्कराचं वाहन उडवलं.

छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर नक्षलवाद्यांनी ब्लास्ट केला आहे. या सात ते आठ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी ६ जानेवारी रोजी कुटरू भागात ही घटना घडली. नक्षल ऑपरेशन विवेकानंद सिन्हा यांनी सांगितलं, की नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता हा हल्ला केला.बस्तरच्या महानिरीक्षकांनी जवानांचं वाहन उडवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात किती जवान शहीद झाले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातहून अधिक जवान शहीद झाले आहेत.

बीजापूरमध्ये झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. सोमवारी कुटरू भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या चिलखती वाहनाला लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी वाहनावर IED ब्लास्ट करत स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात काही जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्काराच्या वाहनावर ज्यावेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी जवान ऑपरेशनवरुन निघाले होते. बस्तरच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात दंतेवाडातील ८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू जाला आहे. हे सर्व जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूरमध्ये संयुक्त कारवाई करून परतत होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.