“खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” – मंत्री गुलाबराव पाटील

“खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” – मंत्री गुलाबराव पाटील ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन*जळगाव, ५ जानेवारी: पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव नगरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे.उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, “सॉफ़्टबॉलसारख्या स्पर्धा शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि मानसिक समतोल वाढवण्यास मदत करतात. खेळ विद्यार्थ्यांना सामूहिकतेची भावना आणि अनुशासनाचे महत्त्व पटवून देतात.” “खेल भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा आहे.

ती विद्यार्थ्यांना मेहनत, एकता, सहयोग आणि परस्पर आदर शिकवते, जे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ६८ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत व खेळाडूंना शुभेच्छा देत, “आपल्या क्रीडाशक्तीला प्रकट करा आणि सकारात्मक बदल घडवा,” मैत्रीपूर्ण स्पर्धेची भावना कायम ठेवा आणि आपल्या मेहनतीद्वारे समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या.”या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल जळगाव शहराचे कौतुक करत त्यांनी सांगितले, या स्पर्धेमुळे जळगावला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळत आहे. क्रीडा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकीचा बोध देते.”

उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदर. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदर. राजूमामा भोळे, पंजाबचे आमदर विनरजित सिंग,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री नारायणाप्पा खडके , शाम कोगटा, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, माजी नगरसेविका श्रीमती उज्वलाताई बेंडाळे, सॉफ्टबॉल महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पी. ई .तात्या पाटील, स्पर्धा निरीक्षक श्री पदम सिंग कौंतेय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री गुलाबराव पाटील आकाशात फुगे सोडून राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन झाले असे केले. त्यावेळी खेळाडूंनी आतिषबाजी देखील केली. तसेच मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजू मामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडांगणाचे पूजन करून स्वतः सॉफ्टबॉल खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.बहारदार सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले तर आभार सचिन निकम क्रीडा अधिकारी यांनी मांनले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.