पत्रकार दिन आणि बाळशास्त्री जांभेकर.

पत्रकार दिन आणि बाळशास्त्री जांभेकर. मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी आज दर्पण सुरु केले … तो दिवस आपल्या राज्यात आज पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो…!!
काय योगदान होतं बाळशास्त्री जांभेकराचं हे कळावं म्हणून आजच्या दिनाचं औचित्य साधून त्यावर प्रकाश टाकतो आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नाही तो समाज भविष्य घडवू शकत नाही… म्हणून अशा थोर व्यक्तींची माहिती मिळाली पाहिजे म्हणून हा लेख प्रपंच…!! बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20, फेब्रुवारी 1812 चा, मुंबईत 1825 साली आले .. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत शिक्षण घेऊन केवळ त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यावर वयाच्या 20 व्या वर्षी एलिफ़िस्टन कॉलेज मध्ये सह प्राध्यापक झाले. कदाचित भारतातील पहिले प्राध्यापक असावेत जे इंग्रजी शिकवत  अनेक लिप्यांचे अभ्यासक असल्यामुळे कोकणातील प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट यांचा अभ्यास करून त्यांनी शोध निबंध लिहले.त्यामुळे भारतातील पुरातत्व विषयाचे पहिले अभ्यासक म्हणूनही त्यांचं नाव आहेच

 संत ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी मराठीतून मुद्रित करून समस्त मराठी भाषकांच्या घराघरात ज्ञानेश्वरी पोहचविण्याला मोठा हातभारही जांभेकरांनी लावला. गणित आणि खगोलशास्त्रातली त्यांची गती ओळखुन तत्कालीन सरकारने त्यांना कुलाबा वेध शाळेचे संचालक म्हणूनही नियुक्त केलं होतं  सर्व विषयांचा सखोल अभ्यास असलेल्या जांभेकरांना मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणूनही तत्कालीन सरकारने त्यांची नियुक्ती केली. त्याकाळात त्यांनी मराठी भाषेत पाठयपुस्तक लिहली. ते पत्रकार होते, साडेआठ वर्षे त्यांनी दर्पण चालवले त्यांनतर दिग्दर्शन नावाचे पूर्णपणे शिक्षणाच्या प्रसाराला वाहिलेले मासिक काढले. त्यात त्यांना त्यांचे विद्यार्थी दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजीलाड यांनी मदत केली होती. अशा या दर्पण दिनी 6 जानेवारी रोजी आपल्या राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दर्पण दिनानिमित्त माध्यमात काम करणाऱ्या सर्वांना, वाचकांना, दर्शकांना खुप खुप शुभेच्छा…!!

 

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.