एकत्र जेवले, नंतर एकत्रच झोपले, सकाळी पतीने समोरचं दृष्य पाहिलं आणि… पत्नीचं टोकाचं पाऊल,

एका विवाहित महिलेले टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पती-पत्नीत कोणताही वाद नसताना घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत कोणताही वाद नसताना पतीने टोकाचं पाऊस उचलल्याची घटना समोर आली आहे. पती-पत्नी आनंदात एकत्र राहत होते. ३ जून रोजी दोघं एकत्र जेवले आणि नंतर एकत्रच झोपले, पण सकाळी पती उठल्यानंतर त्याला समोर जे दृष्य दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली.महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तो ऑफिसवरुन आल्यानंतर तो पत्नीसोबत जेवला, दोघं एकत्र झोपलेही. पण सकाळी ४ वाजता त्याला जाग आली, त्यावेळी पत्नी फासाला लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसली. हे दृष्य पाहून तो हादरला. त्याने तात्काळ कुटुंबिय आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोपाळमधील छोला या भागात हा प्रकार घडला.

२२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. १८ फ्रेबुवारी रोजी दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती. नुकतंच ९ नोव्हेंबर रोजी महिलेच्या सासरच्या लोकांनी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. मृत महिलेला पती आकाश हा प्रायव्हेट नोकरी करत आहे. तर २२ वर्षीय खुशी घरातच डान्स क्लास घेत होती. दोघांमध्ये कधीही वाद नव्हता. मात्र तिने अशाप्रकारे उचललेल्या टोकाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. खुशी कोणत्या तणावात होती का? किंवा काही समस्या होती याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांना घटनेची मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. मात्र पोलिसांना प्राथमिक तपासात कुठेही सुसाइट नोट आढळली नाही. तसंच महिलेने मृत्यूआधी कोणालाही कॉल किंवा मेसेज केला नव्हता. त्याशिवाय महिलेच्या माहेरच्या व्यक्तींकडूनही तिच्या पतीवर किंवा इतर सासरच्या मंडळींवर कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खुशीने टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.