‘सिव्हिल’मधील बाळ चोरीचा १२ तासांत उलगडा, एमबीए महिलेचं कृत्य,

 बाळाच्या अपहरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालकाने वरिष्ठ निरीक्षक कड यांच्याशी संपर्क साधला. त्या महिलेला निमाणीत सोडले असून, गायीचे दूध खरेदी करून ती पुढे गेल्याचे त्याने सांगितले. या धागा पोलिसांना दिंडोरीपर्यंत घेऊन गेला. सातत्याने प्रयत्न करूनही मूलबाळ होत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या महिलेने ‘आई’ होण्यासाठी दुसऱ्याच्या मातृत्वाचा अधिकार हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघड झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळाचे अपहरण केलेल्या धुळे येथील ३२ वर्षीय प्रिया (नाव बदलले आहे) या उच्चशिक्षित संशयित महिलेला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकल्या. तिच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 सातत्याने प्रयत्न करूनही मूलबाळ होत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या महिलेने ‘आई’ होण्यासाठी दुसऱ्याच्या मातृत्वाचा अधिकार हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघड झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळाचे अपहरण केलेल्या धुळे येथील ३२ वर्षीय प्रिया (नाव बदलले आहे) या उच्चशिक्षित संशयित महिलेला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकल्या. तिच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी (दि. ४) सकाळी बारा वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील सुमन अब्दुल खान यांच्या पाच दिवसांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना उघड झाली. त्यावरून रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने संपूर्ण तपासाची जबाबदारी घेत पोलिसांना पाचारण केले. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांसह गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर कड दाखल झाले. सीसीटीव्ही तपासून संशयित महिलेच्या मागावर पथक रवाना करण्याची सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली. गुन्हे शाखा एकने तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित महिलेची माहिती संकलित केली. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार अनुजा येवले, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, राम बर्डे, समाधान पवार यांनी शनिवारी मध्यरात्री सापळा रचून संशयितेला ताब्यात घेतले. सुमन खान यांच्यासह निफाड येथील एक विवाहिता नुकतीच जिल्हा रुग्णालयात प्रसूत झाली होती. त्या महिलेबरोबर तेरा वर्षांची मुलगी होती. या मुलीशी संशयित महिला सातत्याने गप्पा मारत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी मुलीची माहिती काढून निफाड गाठले. तिला विश्वासात घेत घटनेचे गांभीर्य समजावून सांगत संशयितेची माहिती मिळवली. संशयित महिला धुळे येथील असल्याचे समजताच तेथे ‘नेटवर्क’ कार्यरत केले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून रिक्षाने संशयित निमाणीपर्यंत पोहोचल्याचे समजले. तिने ऐंशी रुपये रिक्षा भाडे देत पाथरवट लेनमध्ये वडिलांच्या ओळखीतल्या कुटुंबाचे गाठले. दिंडोरी येथून भावाला बोलावून घेतले. दुचाकीवरून आलेल्या भावासोबत रात्री संशयित महिला दिंडोरीतील कादवानगरातील वडिलांच्या घरी पोहोचली. तितक्यात पोलिसही तेथे धडकले आणि घटनेचा उलगडा झाला. दरम्यान, बाळाच्या अपहरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालकाने वरिष्ठ निरीक्षक कड यांच्याशी संपर्क साधला. त्या महिलेला निमाणीत सोडले असून, गायीचे दूध खरेदी करून ती पुढे गेल्याचे त्याने सांगितले. या धागा पोलिसांना दिंडोरीपर्यंत घेऊन गेला.

संशयित महिलेचा यापूर्वी दोनवेळा गर्भपात झाला आहे. गर्भधारणा होत नसल्याने ती चिंताग्रस्त होती. त्यातूनच तिने बाळाचे अपहरण करण्याचा डाव आखला. काही महिन्यांपासून गर्भवती असल्याचा दावा तिने माहेरी व सासरी केला होता. यासह ‘मी गर्भवती असल्याने कोणीही इकडे येऊ नका. प्रसूतीनंतर मीच बाळासह तेथे येते’, असाही दावा तिने सासरी केला होता. दरम्यान, बाळाचे अपहरण केल्यानंतर वडिलांकडे पोहोचल्यावर त्यांचाही तिच्यावर संशय बळावला. संशयितेला तिच्या सासरहून कोणताही त्रास नव्हता. घटनेची माहिती मिळताच तिचा पतीही नाशिकमध्ये दाखल झाला. त्याने व तिच्या वडिलांनी तपासात सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना सोळा वर्षीय मित्राने आपल्या चौदा वर्षीय मित्राकडे मागणी केली. त्याने नकार दिला असता सोळा वर्षीय अनिरुद्ध कदम याने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नशा…

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूकदार तक्रारीसाठी गर्दी करीत असून, मुंबईत आतापर्यंत जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत.दामदुप्पट परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणाऱ्या ‘टोरेस’विरुद्ध तक्रारदारांचा ओघ सुरूच आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    टोरेसविरोधात तक्रारींचा पाऊस; मुंबईत आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर

    हॉटेलमधून ‘एमडी’ तस्करी; नाशकात ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, तीन महिलांसह एकाला अटक

    हॉटेलमधून ‘एमडी’ तस्करी; नाशकात ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त, तीन महिलांसह एकाला अटक

    नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.

    नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दुर्लक्षित वारसास्थळ असलेल्या नारायणपुर गावातील पुरातन वास्तू श्री विष्णू नारायण मंदिर.

    कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग, मोठे नुकसान, नागरिकांमध्ये घबराट

    कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग, मोठे नुकसान, नागरिकांमध्ये घबराट

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन