आता काय राऊतांना पक्षातून काढू का? मातोश्रीवर साळवी-ठाकरेंमध्ये खडाजंगी, दाराआड काय घडलं?

कोकणातील ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिची मिळतंय. ,उद्धव ठाकरे यांच्यासमोर तक्रारीच पाडा वाचताना राजन साळवी ही दिसले.कोकणातील ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पराभवानंतर राजन साळवी हे नाराज आहेत. मात्र, एक पत्रकार परिषद घेत त्यांनी स्पष्ट केले की, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार. आता त्यानंतर थेट आपल्या तक्रारीचा पाढा वाचवण्यासाठी राजन साळवी हे मातोश्रीवर पोहोचले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला आणि थेट राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच खडाजंगी झाली.

उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या भेटीदरम्यान नेमके काय घडले, याची माहिती सुत्रांनी दिलीये. राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही पदाधिकारी आणि मुंबईतील प्रमुख उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजन साळवी यांनी आपल्या पराभवाचे खापर हे विनायक राऊत यांच्यावर फोडले. विनायक राऊत यांच्याबद्दल तक्रार करताच उद्धव ठाकरे म्हणाले, विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाहीत का?यावर उत्तर देत राजन साळवी यांनी थेट म्हटले, मी त्यांना 21 हजाराचे लीड दिले. उद्धव ठाकरेंना सवाल करत साळवी म्हणाले, तुम्हीच सांगा मग त्यांच्या पराभवाला मी कसा जबाबदार?. राजन साळवीचे बोलणे ऐकून उद्धव ठाकरे थेट म्हणाले, मग मी काय करू आता?. विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला. यावर राजन साळवी म्हणाले, तो आपला निर्णय आहे. हेच नाहीतर हा संवाद इथेच थांबला नाही.यावर थेट उद्धव ठाकरे हे राजन साळवी यांना म्हणाले की, तुम्हाला जर भाजपात जायचं असेल तर जा…उद्धव ठाकरे यांच्या या बोलण्यानंतर राजन साळवी हे नेमके काय निर्णय घेतात हे आता पाहण्यासारखे ठरणार आहे. खरोखरच आता राजन साळवी हे उबाठा गटाला सोडचिठ्ठी देणार का?. हे पाहण्यासारखे ठरले. मात्र, उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यातील खंडाजगीची चर्चा आता जोरदार रंगताना दिसत आहे. राजापूर मतदार संघातून राजन साळवी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.