पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप, थेट देवेंद्र फडणवीसांकडेच…

बीडच्या मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यासाठी विविध स्तरावर मागण्या होत आहेत. अंजली दमानिया यांनी आरोप करत कारवाईसाठी उपोषण केले. अंजली दमानियाने धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर आता गंभीर आरोप केले आहेत.बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप हे सातत्याने केली जात आहेत. काही आरोपींना अटकही करण्यात आलीये. एकजण अजूनही फरार आहे. आरोपींमध्ये वाढ होऊ शकते, असे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटले. आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी सातत्याने केली जातंय. अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन देखील केले जातंय. बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला राज्यातील अनेक मोठे नेते दाखल झाली होती.

अंजली दमानिया यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी वाल्मिक कराडवर त्यांनी आरोप केले. यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होणार नाही, तोपर्यंत आपण बीडमधून हलणार नसल्याची भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली.आता नुकताच अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्ये हे आपला मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीमध्ये वाल्मिक कराड हा पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत होता. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून धनंजय आणि पंकजा एकत्र आहेत. दोघांचेही कार्यकर्ते माझा मानसिक छळ करत आहेत.नेमक्या कशाप्रकारचा माझा छळ सुरू आहे आणि मला कशापद्धतीने त्रास दिला जातोय. हे मी सविस्तर सांगेल. मी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार करणार आहे. त्यांना मी वेळ मागितला आहे. मी पत्रकार परिषद घेत याबद्दल सविस्तर माहिती देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले होते. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम अंजली दमानिया करत असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनसमोर आंदोलनही बीडमध्ये अंजली दमानिया विरोधात करण्यात आले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.