नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे.चंद्रपूर शहराच्या गौतमनगर भागात चार अल्पवयीन मुलांनी शुक्रवार रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाची हत्या केली. अंचलेश्वर परिसरात दुचाकीने जाताना दुचाकीचा कट लागून वाहनाचे नुकसान झाल्याचे कारण पुढे आले आहे. कट लागल्यावर तन्मय शेख या युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. मयताने यासाठी घराकडे सोबत यावे असे सांगत सर्वांना गौतमनगर परिसरात आणले. मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत तन्मय शेख याची हत्या करत मृतदेह झुडूपात फेकला.

नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे. यात एक आरोपी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देखील आहे.पोलिसांनी परिसरात विचारपूस केली असता, मारहाण करणारे चार विधिसंघर्षग्रस्त बालके असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकीत या अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतकाच्या दुचाकीची वाहनाला धडक बसली. नुकसानभरपाई द्यावी म्हणून महाकाली मंदिर गौतम नगरकडे घेऊन गेले. भरपाईच्या रकमेवरून वाद झाला. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने ठेचून ठार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात चार अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस करीत आहेत.










